शाळा बद्दलची माहिती

शाळेचा इतिहास

  भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार विद्यार्थीदशेत संस्काराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.या वयात झालेले संस्कार आयुष्याभर मार्गदर्शन ठरतात.आजच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनात पालकांना पाल्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. विद्यार्थी सर्वांगीण प्रगती लक्षपूर्वक व्हावी म्हणून ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’णे ‘अर्धगुरुकुल’ ही योजना सुरु केली आहे.

   जीवनाला साफल्य किंवा यशस्वी करणारी कृतार्थ विद्या व संस्कार नाहीत.त्याचीच आज जास्त गरज आहे.आजच्या शिक्षणात व विद्यार्थ्यामध्ये प्रयोगशीलता हवी.विद्यार्थ्याचे आरोग्य त्यांची बुद्धिमत्ता त्यांच्या भावना व सौंदर्य   या चारही गोष्टी लक्षात घेऊन विद्यालय सुरु केले.

येथून बाहेर पडणारा विद्यार्थी केवळ पुस्तकी शिक्षण न घेता तो घडावा व केवळ भारतातच नव्हे तर या जगात एक यशस्वी देशाचा यशस्वी नागरिक म्हणून उभा राहवा.त्याचे व्यक्तीमत्त्व अभ्यास व कर्तुत्व यांचा सर्वांगीण विकास व्हावा.प्राचीन भारताची परंपरा सांगणारे संस्कृत व आजच्या युगातील इंटरनेट आधुनिक शिक्षण प्रणाली यांची योग्य पद्धतीने सांगड घालून व ते फक्त साचे बद्ध न ठेवता वैश्विक करण्याचा हा विचार व माणसा एकविसाव्या शतकात दिसणारे भारताचे चित्र हे सर्व जगापुढे एक आदर्श म्हणून उभे राहवे यासाठीच डा.मो.स.गोसावी यांनी सरांच्या प्रेरणेतून विध्यालायाची सुरवात केली.

      सामाजिक बांधिलकीची जाणीव विध्यार्थ्यात निर्माण व्हावी यासाठी जनजागृती द्वारे विध्यार्थ्यांचे उद्बोधन केले जाते. विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी समुह नृत्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा व क्रिडा स्पर्धा ई.मार्फत आपले कलागुण दाखवून बक्षिसास पात्र झाले.विविध भाषांचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी मराठी,हिंदी,इंग्रजी,संस्कृत ई. विषयांचे अध्यन केले जाते.

 

शाळेची स्थापना :    जून २००२,   (नमाशा/१००२/८५९१/२००२ माशि १७/०६/२००४)

शाळेचे देणगीदार : कै.मालतीबाई मनोहरपंत कुलकर्णी