ध्येय व उद्दीष्ट्ये

ध्येय

आजूबाजूच्या परिसराचा विचार करता सर्व सामान्यांनाहि उच्च दर्जाचे,संस्कारक्षम व जीवन विकासाचे शिक्षण मिळावे ह्या दूरदृष्टीकोनातून गोखले एज्युकेशन सोसायटीने मालतीबाई कुलकर्णी (माध्यमिक विभाग) विद्यालयाची स्थापना केली.

उद्दीष्ट्ये

  • विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधने.
  • शालेय गुणवत्ता वाढीसाठी सर्वांगीण मार्गदर्शन करणे.
  • तार्किक बुद्धीचा विकास करणारी मुलभूत गणिती कौशल्ये संपादन व त्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्यास मदत करणे.
  • वैज्ञानिक दृष्टीकोणाचा विकास करणे, निरीक्षण, तुलना, वर्गीकरण,प्रयोग करणे, निष्कर्ष काढणे व त्यांचे निवेदन करणे यांसारखी मुलभूत कौशल्ये निर्माण करणे.
  • विद्यार्थ्यांना स्वप्रयात्नातून ज्ञान प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देणे.
  • परिसर आणि मानवी जीवन यांतील परस्परसंबध समजून घेण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे.
  • पर्यावरण संरक्षण करण्याची जाणीव-जागृती निर्माण करणे.
  • परिवर्तन आणि देशाची परंपरा व वारसा यांची निरंतरता यांमध्ये संतुलित समन्वय राखण्यासाठी योग्य अशी जाणीव निर्माण करणे.
  • विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांची जोपासना करणे.
  • विद्यार्थ्यामध्ये श्रमप्रतिष्ठेची जाणीव निर्माण करणे.