ध्येय
आजूबाजूच्या परिसराचा विचार करता सर्व सामान्यांनाहि उच्च दर्जाचे,संस्कारक्षम व जीवन विकासाचे शिक्षण मिळावे ह्या दूरदृष्टीकोनातून गोखले एज्युकेशन सोसायटीने मालतीबाई कुलकर्णी (माध्यमिक विभाग) विद्यालयाची स्थापना केली.
उद्दीष्ट्ये
- विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधने.
- शालेय गुणवत्ता वाढीसाठी सर्वांगीण मार्गदर्शन करणे.
- तार्किक बुद्धीचा विकास करणारी मुलभूत गणिती कौशल्ये संपादन व त्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्यास मदत करणे.
- वैज्ञानिक दृष्टीकोणाचा विकास करणे, निरीक्षण, तुलना, वर्गीकरण,प्रयोग करणे, निष्कर्ष काढणे व त्यांचे निवेदन करणे यांसारखी मुलभूत कौशल्ये निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांना स्वप्रयात्नातून ज्ञान प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देणे.
- परिसर आणि मानवी जीवन यांतील परस्परसंबध समजून घेण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे.
- पर्यावरण संरक्षण करण्याची जाणीव-जागृती निर्माण करणे.
- परिवर्तन आणि देशाची परंपरा व वारसा यांची निरंतरता यांमध्ये संतुलित समन्वय राखण्यासाठी योग्य अशी जाणीव निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांची जोपासना करणे.
- विद्यार्थ्यामध्ये श्रमप्रतिष्ठेची जाणीव निर्माण करणे.
व्हिजन
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण निर्माण करणे व कौशाल्याधिष्ठीत शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श नागरीक निर्माण करणे.
मिशन
१) समाजातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्तापुर्ण, संस्कारक्षम शिक्षण देणे.
२) सहशालेय उपक्रम, क्रीडा, स्काऊट गाईड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, नेतृत्वगुण आणि सांघिक कार्याची भावना विकसित करणे
