मुख्याध्यापक संदेश

नमस्कार
१०५ वर्षाची परंपरा असलेल्या वटवृक्ष गोखले एज्युकेशन सोसायटीची ज्ञानरूपी एक पारंबी म्हणजे मालतीबाई कुलकर्णी विद्यालय.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच विद्यालयातील शिक्षकांचे व शाळेचे ध्येय विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विद्यार्ध्याणा दर्जेदार शिक्षण, योग्य मार्गदर्शन, पूरक वातावरण व कृतीशील वातावरण पुरविले जाते.
विद्यार्थ्यांना शाळेत प्रदर्शन, उपक्रम, प्रकल्प, विविध स्पर्धा या माध्यमातून विविध अनुभव देऊन विद्यार्थी – शिक्षक व विद्यार्थी – पालक अशी सकारात्मक आंतरक्रिया घडते आहे.
शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षक व पालकांमधील संवाद शालेय व्यवस्थापन समिती, मातापालक संघ, पालक शिक्षक संघ मार्फत सकारात्मक होत आहे सखी सावित्री समिती, विशाखा समिती मार्फत पालकांच्या अडचणी सोडविणे सोपे होत आहे. पालक व शिक्षक यांमधील सकारात्मक संवादामुळे विद्यार्थ्याचा विकास प्रगतीपथावर आहे.
शिक्षक, शिक्षतेकर यांमधील सहकार्य, कामाप्रती आनंदी भाव, रोज काहीतरी नवीन व चांगले करण्याची इच्छा या गोष्टी नक्कीच गुणवत्ता व विकास वाढीसाठी मोलच्या ठरत आहेत. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारिरिक, मानसिक विकास साधण्याच्या हेतूने विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन विद्यालयात होत असते.
मालतीबाई कुलकर्णी विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून काम करत असताना शिक्षण महर्षी कै.सर डॉ.मो.स.गोसावी सर व मा.डॉ.श्री.एस.बी.पंडित सर यांचे आशीर्वाद लाभत आहेत तसेच संस्थेच्या सचिव व एच.आर.डायरेक्टर मा.प्रा.सौ.दीप्ती देशपांडे मॅडम, अध्यक्ष मा.डॉ.श्री.आर.पी.देशपांडे सर यांचे आशीर्वाद लाभत आहे. तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी लाभत आहे. समाजातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे ध्येय समोर ठेवून विद्यालयाची यशाच्या क्षितिजाकडे वाटचाल होत आहे या वटवृक्षाचा मी एक घटक आहे याचा माला सार्थ अभिमान आणि गर्व आहे .
धन्यवाद……..
श्रीम.गौरी काकडे
प्रभारी मुख्याध्यापिका
मालतीबाई कुलकर्णी विद्यालय, नाशिक
